थुगावात किडमुक्त शेतीचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थुगावात किडमुक्त शेतीचा निर्धार
थुगावात किडमुक्त शेतीचा निर्धार

थुगावात किडमुक्त शेतीचा निर्धार

sakal_logo
By

सातगाव पठार, ता. १५ : थुगाव (ता.आंबेगाव) येथे विषमुक्त, किडमुक्त शेती अभियान राबविण्यात आले. यावेळी थुगाव ग्रामपंचायत व पेठ येथील जी.आय.सी. बटाटा प्रकल्पाच्या वतीने शेतकऱ्यांना उन्नी व्यवस्थापन सापळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी संपूर्ण शेती विषमुक्त, किडमुक्त करण्यासाचा निर्धार केला आहे.
विषारी केमिकल कमी प्रमाणात वापरून शेतजमिनीचा पोत सुधारणा केली जाणार आहे. येथील श्रीरामबाबा मंदिरात अभियान राबविण्यात आले. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी गावातून फेरी काढत घोषणा दिल्या. उन्नी संपवा, पीक वाचवा, उन्नी व्यवस्थापन खर्च छोटा, फायदा मात्र खुपच मोठा अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले होते.
सदर कार्यक्रमावेळी ग्रीन ईनोव्हेशनचे गेरीट क्लॉलीट्झ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अमरसींग पाटील, नीलेश कडूसकर, विकास सणस, सुनील तोत्रे, भूषण एरंडे, संगीता पाटील, दशरथ काळे, विठ्ठल बबन एरंडे यांसह सातगाव पठार फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सर्व प्रतिनिधी तसेच परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन श्रीरामबाबा शेतकरी कृषी विकास गट, शिवक्रांती शेतकरी कृषी विकास गट, श्रीगणेश शेतकरी कृषी विकास गट आणि जी.आय.सी बटाटा प्रकल्प यांच्या वतीने केले होते.

01776

Web Title: Todays Latest District Marathi News Sth22b00961 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top