सुप्यात सामाजिक एकतेसाठी प्रार्थना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुप्यात सामाजिक एकतेसाठी प्रार्थना
सुप्यात सामाजिक एकतेसाठी प्रार्थना

सुप्यात सामाजिक एकतेसाठी प्रार्थना

sakal_logo
By

सुपे, ता. ३ : अक्षय तृतीया व रमजान ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद व अक्षय तृतीया उत्साहात साजरी केली. सुपे (ता. बारामती) येथे उत्साही वातावरणात सकाळपासूनच लगबग चालू होती.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे ईद घरातच साजरी करावी लागली होती. त्यामुळे यंदा ईदचा उत्साह वाढला होता. येथील ईदगाह मैदानावर मौलाना परवेझ आलम रझवी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक नमाज पठण झाले. सर्वांसाठी सुख, समृद्धी, शांती, सामाजिक एकतेसाठी प्रार्थना करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ख्वाजा शाहमन्सूर बाबांच्या दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले.

Web Title: Todays Latest District Marathi News Sup22b00683 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top