
काऱ्हाटीतील कृषी संस्थेस कोल्हे यांची भेट
सुपे, ता.१२ : काऱ्हाटी (ता.बारामती) येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलाला खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी नुकतीच भेट दिली व येथील विविध उपक्रमांचे कौतुक केले. बारामती-पुणे मार्गालगत काऱ्हाटी येथे कृषी उद्योग संस्थेच्या माध्यमातून अद्ययावत शैक्षणिक संकुल उभारले जात आहे. संकुलातील औद्योगिक प्रशिक्षण विभागाच्या फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिशियन, स्थापत्य विभाग, तसेच शेतीमध्ये विविध फळझाडे लावली आहेत, आदींची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. या वेळी कोल्हे यांनी येथील विविध विभागातील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. देशाचे भविष्य घडवण्यासाठी आजच्या युवकाला घडवताना सशक्त आणि पोषक वातावरण देऊन भावी आयुष्याची शिदोरी बळकट करणारी ही संस्था आणि येथील उपक्रम आहेत अशा शब्दात कोल्हे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांच्या समवेत संस्थेचे सचिव प्रफुल्ल तावरे, प्राचार्य विकास निर्मल अन्य विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
01076
Web Title: Todays Latest District Marathi News Sup22b00687 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..