मयूरेश्वर अभयारण्यात प्राण्यांचे निरीक्षण : जैनक मयूरेश्वर अभयारण्यात प्राण्यांचे निरीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मयूरेश्वर अभयारण्यात प्राण्यांचे निरीक्षण : जैनक
मयूरेश्वर अभयारण्यात प्राण्यांचे निरीक्षण
मयूरेश्वर अभयारण्यात प्राण्यांचे निरीक्षण : जैनक मयूरेश्वर अभयारण्यात प्राण्यांचे निरीक्षण

मयूरेश्वर अभयारण्यात प्राण्यांचे निरीक्षण : जैनक मयूरेश्वर अभयारण्यात प्राण्यांचे निरीक्षण

sakal_logo
By

सुपे, ता. १९ : येथील (ता.बारामती) मयुरेश्वर अभयारण्यामध्ये बौद्धपोर्णिमेला पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची नोंद घेऊन निसर्गानुभव घेण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी अतुल जैनक यांनी दिली. अभयारण्यातील पाच पाणवठ्यावर लपनगृह व काही ठिकाणी झाडांवर मचाण करून दिसलेल्या प्राण्यांचे निरिक्षण करून नोंदी करण्यात आल्या. यादिवशी ५३ चिंकारा हरिण, खोकड व मोर ३, गरूड व लांडगे २ आणि एक ससा व एक तरस आढळून आले. वनरक्षक प्रशांत जाधव, संतोष जराड, विनोद रणसिंग, वनमजूर राजेंद्र सकट, महादेव बधे, नवनाथ मंडले आदींसह निसर्गप्रेमी दीपकसिंग ठाकूर व प्रल्हाद जाधव यांनी या निसर्गानुभवासाठी सहभाग घेतला होता. पुढील आठवड्यात अभयारण्यातील प्रत्येक भागात जाऊन चिंकारा हरणांच्या संख्येची नोंद घेण्यात येणार असल्याची माहिती जैनक यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Sup22b00690 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top