ई-पीक पाहणी कामात व्यत्यय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पीक पाहणी कामात व्यत्यय
ई-पीक पाहणी कामात व्यत्यय

ई-पीक पाहणी कामात व्यत्यय

sakal_logo
By

सुपे, ता. ७ : शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील पीक पेरणीची नोंद करण्यासाठीची ई-पीक पाहणी प्रणाली दोन-तीन दिवसांपूर्वी सुरू झाली असून, माहिती भरताना त्यात व्यत्यय येत असल्याने शेतकऱ्यांना सोसायट्यांमार्फत कर्ज भरणे व काढण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. या प्रणालीतील दोष तातडीने काढण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
सातबारा उताऱ्यावरील पिकांच्या नोंदीनुसार बँक अथवा सोसायट्यांकडून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. मात्र, ही ई-पीक पाहणी प्रणाली अनेक दिवस बंद होती. नुकतीच ही प्रणाली चालू झाल्याने शेतकऱ्यांनी पीक नोंदणी सुरू केली. मात्र, अनेक कारणांनी अद्यापही या नोंदी पूर्ण होत नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
याबाबत दंडवाडीचे जालिंदर चांदगुडे म्हणाले, ‘‘परिसरातील शेतकऱ्यांना शेतीची मशागत, पेरणी आदींसाठी पैशांची गरज आहे. नेमक्या अडचणीच्या काळात ही प्रणाली व्यवस्थित चालत नसल्याने शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित आहेत.’’
सुमारे दोन महिन्यांपासून ही प्रणाली बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाल्याची माहिती भोंडवेवाडीचे शेतकरी नितीन शेळके यांनी दिली. कुटुंबातील सातपैकी चार गटांची नोंद झाली आहे. उर्वरित गटांची नोंद नसल्याने कर्जापासून वंचित राहिलो आहे, असे त्यांनी सांगितले. बोरकरवाडीचे शेतकरी गणेश विजय कदम म्हणाले, ‘‘गटाची फाळणी झाल्याने सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद येत नाही. त्यामुळे कर्ज मिळत नाही.’’
सुप्याचे कामगार तलाठी नितीन यादव म्हणाले, ‘‘या स्थितीची वरिष्ठांना कल्पना दिली आहे. यावर लवकरच मार्ग निघून शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल.’’

मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांनी केलेल्या ई-पीक पाहणीपैकी ९० टक्के पीक पाहणी सातबारा उताऱ्यावर दिसणार असून, उर्वरित १० टक्के पीक पाहणी ही तलाठी यांच्याकडे प्रत्यक्ष तपासणी करिता दिली आहे. या १० टक्क्यांतील गट अस्पष्ट फोटो, दूरवरून काढलेले फोटो, गटाचे स्थान, न जुळलेले गट, असे गट लवकरच तलाठी लॉगीनमध्ये तपासणी करिता उपलब्ध करून देत आहोत.
- श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक, ई- पीक पाहणी प्रकल्प

Web Title: Todays Latest District Marathi News Sup22b00717 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..