सुपे इंग्लिश स्कूलतर्फे गरजुंची दिवाळी गोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपे इंग्लिश स्कूलतर्फे गरजुंची दिवाळी गोड
सुपे इंग्लिश स्कूलतर्फे गरजुंची दिवाळी गोड

सुपे इंग्लिश स्कूलतर्फे गरजुंची दिवाळी गोड

sakal_logo
By

सुपे, ता. २३ : विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश स्कूलच्यावतीने माणुसकीची भिंत या उपक्रमाद्वारे सुमारे शंभर गरजू कुटुंबांची दिवाळी गोड केल्याची माहिती प्राचार्य योगेश पाटील यांनी दिली. या शाळेने एक दिवा, एक लाडू माणुसकीची भिंत जोडू या उपक्रमांतर्गत गरीब मजूरांच्या कुटुंबाची दिवळी गोड होण्यासाठी हा उपक्रम राबवला. आवाहन केल्यानुसार विद्यार्थी व पालकांनी आपापल्यापरीने साखर, डाळ, गरा, चिवड्याचे साहित्य, साबण, उटणे, पणत्या, आकाश कंदील, साड्या, कपडे, लहान मुलांचे तयार ड्रेस, ब्लँकेट आदी साहित्य शाळेत आणून दिले. हे साहित्य दिवाळीच्या पार्श्वभूमिवर गरजू मजूर कुटुंबांना देण्यात आले. जाती भेदाच्या पलीकडे जाऊन गरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी या भावनेतून विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी केलेली मदत माणुसकीची भिंत जोडणारी ठरली असे मत प्राचार्य पाटील यांनी व्यक्त केले. गरीबांची दिवाळी गोड झाल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------
01179