सुपे येथे भर उन्हात पावसाचा छिडकावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपे येथे भर उन्हात पावसाचा छिडकावा
सुपे येथे भर उन्हात पावसाचा छिडकावा

सुपे येथे भर उन्हात पावसाचा छिडकावा

sakal_logo
By

सुपे, ता. ११ : सुपे (ता.बारामती) परिसरात आज (ता.११) दुपारी भर उन्हात पावसाच्या हलक्या व तुरळक सरी कोसळल्या. ढगाळ हवामान व अवेळी पाऊस झाला तर कांदा व गव्हाच्या पिकावर अनिष्ट परिणाम होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आज वातावरणात पहाटेपासूनच थंडी गायब झाली होती. ढगाळ हवामान तयार होऊ लागले होते. दुपारी बारा नंतर सुपे व परिसरात भर उन्हात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आणखी पाऊस झाला तर त्याचा परिणाम कांद्यावर फुलकिडी व गव्हावर मावा, तांबेऱ्याचा प्रार्दुभाव होऊन नुकसान होऊ शकते अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.