सुप्यात आजपासून चिंचेचे लिलाव सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुप्यात आजपासून चिंचेचे लिलाव सुरू
सुप्यात आजपासून चिंचेचे लिलाव सुरू

सुप्यात आजपासून चिंचेचे लिलाव सुरू

sakal_logo
By

सुपे, ता. १७ : सुपे (ता. बारामती) येथे शनिवारपासून (ता. १८) चिंचेचा लिलाव सुरू होत आहेत. येथील बारामती तालुका कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या सुपे उपबाजार आवारात सकाळी अकरापासून हे लिलाव सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मिलिंद टांकसाळे, सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
चिंचेच्या खरेदी-विक्रीसाठी येथील बाजारपेठ प्रसिद्ध आहे. राज्यातून व राज्याबाहेरून चिंच खरेदीसाठी व्यापारी येथे येतात. शेतकऱ्यांच्या अखंड व फोडलेल्या चिंचेला चांगला दर मिळतो. गेल्या हंगामात चिंचेच्या सुमारे ४७ हजार ६४२ पोत्यांची आवक झाली होती. त्यावेळी अखंड चिंचेला सरासरी रुपये २ हजार १०० तर फोडलेल्या चिंचेला सरासरी रुपये ६ हजार ५०० दर मिळाल्याची माहिती जगताप यांनी दिली.