सुप्यात महासिद्ध उत्सवानिमित्त नगर प्रदक्षिणा

सुप्यात महासिद्ध उत्सवानिमित्त नगर प्रदक्षिणा

सुपे, ता. १९ : महाशिवरात्रीनिमित्त सुपे (ता. बारामती) येथे महासिद्ध उत्सवानिमित्त श्रीं ची पालखीतून टाळ-मृदंगाच्या निनादात हर हर महादेव, ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरात नगर प्रदक्षिणा झाली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. दारात दिंडी आल्यानंतर सुवासिनींनी औक्षण करून पालखीचे स्वागत केले. उत्सव काळात कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा, भारूड, भजन, अखंड वीणावादन, श्रीशिवलिलामृत ग्रंथ सामुदायिक पारायण आदी धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. श्रीसिद्धेश्वर महादेव मंदिर न्यास, उत्सव समिती, भजनी मंडळ व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हभप प्रमोदमहाराज जगताप, वासुदेवबुवा बुरसे, सुरेशमहाराज साठे, जयराम सुपेकर, संजय ढम आदींची कीर्तने तर संजयमहाराज कुतवळ, माऊलीमहाराज चव्हाण यांची प्रवचने झाल्याची माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त प्रकाश चांदगुडे, सचिव अशोक बसाळे यांनी दिली. महेश स्वामी यांनी पारायणाचे सूत्रसंचालन केले. पोपटदादा भापकर यांची भारुडे झाली. मंदा हिरवे व बजरंग हिरवे यांनी विविध फुलांनी पिंड व गाभारा सजवला होता. दिंडीत सुप्यातील सावतामहाराज, श्रीराम, श्रीविठ्ठल प्रासादिक तसेच, नारोळी, कोळोली, काळखैरेवाडी, खोपवाडी येथील भजनी मंडळे सहभागी झाली होती. रविवार काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com