''महाडीबीटी संकेस्थळावर शेततळ्यासाठी करा अर्ज'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''महाडीबीटी संकेस्थळावर शेततळ्यासाठी करा अर्ज''
''महाडीबीटी संकेस्थळावर शेततळ्यासाठी करा अर्ज''

''महाडीबीटी संकेस्थळावर शेततळ्यासाठी करा अर्ज''

sakal_logo
By

सुपे, ता.२५: वैयक्तिक शेततळ्यासाठी बारामती कृषी उपविभागातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेस्थळावर अर्ज करावेत. तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्याचा समावेश केला आहे. शेततळे अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ झाली आहे. आता शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेंतर्गत बारामती तालुक्यात ७३ लाख ६० हजार, दौंड- ३८ लख २३ हजार, इंदापूर- ६५ लाख ८५ हजार, पुरंदर ८६ लाख ५६ हजार असे एकूण २ कोटी ६४ लाख २४ हजारांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.


''महाडिबीटी'' पोर्टलवर असा करा अर्ज
शेतकऱ्यांनी ''महाडिबीटी'' या संकेस्थळावर ''शेतकरी योजना'' हा पर्याय निवडावा. या अंतर्गत ''वैयक्तिक शेततळे'' ही बाब निवडून इनलेट व आऊटलेट विरहित किंवा इनलेट व आऊटलेटसह यापैकी गरजेनुसार एक उपघटक निवडावा. त्यानंतर शेततळे आकारमान व स्लोप निवडावा. अर्ज भरल्यानंतर ऑनलाइन सोडतीद्वारे निवडीची प्रक्रिया करण्यात येते.