निसर्गाचा समतोल राखल्यास आरोग्य सुदृढ राहील

निसर्गाचा समतोल राखल्यास आरोग्य सुदृढ राहील

सुपे, ता. २१ : ‘‘निसर्गाचा समतोल राखला तरच आपले आरोग्य सुदृढ राहणार आहे. वनाचे आरोग्य राखले तरच आपले आरोग्य चांगले राहील. शेती, वन हा निसर्गाचाच एक भाग आहे. झाडे, प्राणी, पक्षी यांचे संवर्धन झाले पाहिजे.’’ असे मत बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी सुपे (ता. बारामती) येथे व्यक्त केले.
वन विभाग, विद्या प्रतिष्ठानचे सुपे इंग्लिश मीडियम स्कूल व वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सुपे-दंडवाडीच्या हद्दीतील चौफुला-सुपे मार्गावरील छपन्नमेरू परिसरात वनदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण, प्राण्यांसाठी पाणवठ्यात पाणी सोडणे, दगड गोळा करून पांढऱ्या रंगाने रंगवून रस्त्याच्या दुतर्फा लावून या परिसरासाठी रस्ते तयार करणे, वनभोजन आदी वनविषयक जनजागृती कार्यक्रमात लोणकर बोलत होत्या.
या वेळी मोरगावचे वनपरिमंडल अधिकारी अमोल पाचपुते, जयश्री पवार, प्राचार्य डॉ. राहुल पाटील, प्राचार्य योगेश पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांना रोपटे देऊन प्राचार्य डॉ. राहुल पाटील यांनी स्वागत केले.
लोणकर म्हणाल्या, ‘‘झाडांची संख्या कमी झाल्याने घरटी कमी झाली. परिणामी चिमण्यांची संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होतो. निसर्गाचा समतोल राखण्याची आठवण आणि कृती व्हावी म्हणून वनदिन महत्त्वाचा आहे. वनाला आग लागली तर मोठे नुकसान होते. याविषयी काळजी घेण्याची गरज आहे.’’
पाचपुते म्हणाले, ‘‘जिथे काटेरी झाडे नीट येत नाहीत त्या खडकाळ जागी देशी झाडे चांगली उगवून आली आहेत. उजाड माळरानाचे स्वरूप बदलत आहे. हे विद्या प्रतिष्ठानच्या येथील शाळा-महाविद्यालयाने घेतलेल्या ध्यासाचे फळ आहे.’’
या वेळी अंकिता वाबळे, सई भोंडवे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रज्ञारूची बनसोडे यांनी तर दादा राऊत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com