Fri, Sept 22, 2023

खोपवाडी सोसायटीच्या
अध्यक्षपदी चांदगुडे
खोपवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी चांदगुडे
Published on : 4 June 2023, 9:08 am
सुपे, ता. ४ : खोपवाडी (ता. बारामती) येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव चांदगुडे व उपाध्यक्षपदी महादेव जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बारामती येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात नुकतीच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर गायकवाड यांनी कामकाज पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव संजय जाधव व सहसचिव विठ्ठल गोसावी यांनी सहकार्य केले. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा उपस्थित कार्यकर्त्यांनी सत्कार केला.