शिरूरकरांना मिळणार सुरळीत पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरकरांना मिळणार सुरळीत पाणी
शिरूरकरांना मिळणार सुरळीत पाणी

शिरूरकरांना मिळणार सुरळीत पाणी

sakal_logo
By

शिरूर, ता. ३० ः शिरूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील पंपिंग स्टेशनमधील यांत्रिक बिघाडामुळे विस्कळित झालेला शहराचा पाणीपुरवठा उद्या (ता. १ मे) पासून सुरळीत होत आहे. पंपिंग स्टेशनमधील बिघडलेली मोटार युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात आल्याचे नगर परिषदेने कळविले आहे.
शिरूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घोडनदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून, या बंधाऱ्यातील पाणी उपसण्यासाठी बंधाऱ्यालगत पंपिंग स्टेशन उभारण्यात आले असून, या पंपिंग स्टेशनमधील दोन मोटारींद्‍वारे पाण्याचा उपसा करून ते पाणी शहराला पुरविले जाते. तथापि, दोन मोटारींपैकी एक मोटार बिघडल्याने व एका मोटारीद्‍वारे पाणी उपसून ते शहराच्या सर्व भागात पुरविणे अशक्य असल्याने नगर परिषदेने
शहरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बुधवारपासून (ता. २७) शहराची मुख्य गावठाण व उपनगरे अशी दोन भागात विभागणी करून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.

टंचाईचा सामना
घोड नदीपात्रात भरपूर पाणी असतानाही केवळ तांत्रिक बिघाडामुळे शहरवासीयांना गेले चार
दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. या कालावधीत दिवसाआड आणि तोही अल्पकाळच पाणीपुरवठा होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. त्यातच नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर हिरवे असल्याने व त्यास काही प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

यशस्वी चाचणी
पंपिंग स्टेशनमधील बिघडलेली मोटार दुरुस्तीचे काम नगर परिषदेने युद्धपातळीवर हाती घेतले. त्यासाठीचे सुटे भाग मिळण्यास विलंब झाल्याने दुरुस्ती लांबली. गेले तीन - चार दिवस तज्ज्ञ मेकॅनिकच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले दुरुस्तीचे काम आज पहाटे पूर्ण झाले. आज दुरुस्ती केलेल्या मोटारीद्‍वारे पाणी उपशाची
घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली.

मोटारीची चाचणी यशस्वी झाल्याने उद्यापासून पूर्ण क्षमतेने मोटार पाणी उपसण्यास सक्षम असल्याचा निर्वाळा दुरुस्ती पथकाने दिला. त्यामुळे उद्यापासून शहराला ठरल्या वेळेप्रमाणे दररोज सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार आहे.
-ॲड. प्रसाद बोरकर, मुख्याधिकारी, शिरूर नगर परिषद

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00322 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top