छेडछाड प्रकरणातून तर्डोबाची वाडी येथे गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छेडछाड प्रकरणातून तर्डोबाची वाडी येथे गोळीबार
छेडछाड प्रकरणातून तर्डोबाची वाडी येथे गोळीबार

छेडछाड प्रकरणातून तर्डोबाची वाडी येथे गोळीबार

sakal_logo
By

शिरूर, ता. ६ ः मुलीच्या छेडछाड प्रकरणात मिटवामिटवी केल्याचा राग मनात धरून संबंधितांवर गोळीबार केल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री तर्डोबाची वाडी (ता. शिरूर) नजीक घडला.
या प्रकरणी, शिरूर पोलिसांनी अंकुश सुदाम बांदल, धनंजय अशोक पाचर्णे व आकाश रोडे (तिघेही रा. कर्डे, ता. शिरूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. कैलास फक्कड पाचर्णे (रा. कर्डे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी काही जणांनी मध्यस्ती करून प्रकरण मिटविल्याचा राग मनात धरून बांदल याने गोळीबार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यात दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. प्रकाश बाळू पाचर्णे व सुधीर पाचर्णे अशी जखमींची नावे आहेत. मुलीच्या छेडछाडप्रकरणी फिर्यादी, त्यांच्यासोबतचे लोक व गोळीबार करणारे बांदल व त्यांच्यासोबतचे लोक इनोव्हा मोटारीतून शिरूर पोलिस स्टेशनला जात असताना तर्डोबाची वाडीजवळील डुंबरीचा ओढा परिसरात हा प्रकार घडला. जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अंकुश बांदल, धनंजय पाचर्णे व आकाश रोडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00329 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top