तर्डोबाची वाडी गोळीबारप्रकरणी तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तर्डोबाची वाडी गोळीबारप्रकरणी तिघांना अटक
तर्डोबाची वाडी गोळीबारप्रकरणी तिघांना अटक

तर्डोबाची वाडी गोळीबारप्रकरणी तिघांना अटक

sakal_logo
By

शिरूर, ता. ७ : पूर्वीच्या गुन्ह्यात मिटवामिटवी केल्याचा राग मनात धरून तर्डोबाची वाडी जवळील डुंबरीचा मळा परिसरात रिव्हॉल्वर मधून गोळीबार करणाऱ्या तिघांना शिरूर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी (ता. ५) मध्यरात्री गोळीबाराचा हा प्रकार घडला होता. यात दोघे जखमी झाले आहेत.
अंकुश सुदाम बांदल (वय ३९), धनंजय अशोक पाचर्णे (वय ३२) व आकाश तानाजी रोडे (वय २९, तिघे रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांना पोलिसांनी घटना घडल्यानंतर केवळ आठ तासांत अटक केली. शिरूर न्यायालयाने त्यांना सोमवार (ता. १०) पर्यंत पोलिस कोठडी दिली. या गोळीबारात कैलास फक्कड पाचर्णे (वय ४८, रा. करडे) हे जखमी झाले असून, त्यांना वाचवण्यासाठी मधे पडलेल्या सुधीर पाचर्णे यांच्या दिशेनेही बांदल याने गोळीबार केला. मात्र, त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही.
या गंभीर घटनेची नोंद घेत पोलिसांनी हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, तुषार पंदारे, सचिन घाडगे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, संजय साळवे, विजय जंगम या पथकाने सापळा लावून हल्लेखोरांची धरपकड केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00331 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top