
एमआयडीसीत प्रकल्पग्रस्तांना डावलले
शिरूर, ता. १३ : रांजणगाव एमआयडीसीसाठी ज्यांच्या जमीनी गेल्या, त्या प्रकल्पग्रस्तांना औद्योगिकरणातून डावलले जात असल्याच्या निषेधार्थ व एमआयडीसीतील कंपनी व्यवस्थापनाकडून नियमानुसार व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या मागणीसाठी अविनाश सुभाष फलके हा तरुण गेल्या तीन दिवसांपासून मौन पाळून उपोषणाला बसला आहे.
फलके मळा (ता. शिरूर) येथील या आंदोलनाला स्थानिक ग्रामस्थांसह भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे, भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ नवले, कारेगावच्या सरपंच निर्मला नवले, उपसरपंच संदीप नवले, कर्डेलवाडीचे सरपंच राजेंद्र दसगुडे, रांजणगाव प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष योगेश लांडे आदींनी पाठिंबा दिला.
शुक्रवारी त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस असताना एमआयडीसी प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाने कुठलीही दखल न घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा रवींद्र फलके, तेजस फलके, चेतन फलके यांनी दिला.
दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी गुरुवारी (ता. १२) आंदोलकांची भेट घेऊन कंपनी व्यवस्थापनाची एमआयडीसी प्रशासनासोबत मिटींग घडवून त्यात आंदोलकांच्या मागण्या ठेवल्या जातील, असे आश्वासन दिले. मात्र, अशी मिटींग झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार अविनाश फलके यांनी केला.
Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00335 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..