सोनेसांगवी येथे विवाहितेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनेसांगवी येथे विवाहितेची आत्महत्या
सोनेसांगवी येथे विवाहितेची आत्महत्या

सोनेसांगवी येथे विवाहितेची आत्महत्या

sakal_logo
By

शिरूर, ता. १३ : सोनेसांगवी (ता. शिरूर) येथील सुनीता गणेश सोनवणे (वय ३०) या विवाहितेने ती चालवत असलेल्या छोट्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (ता. १२) रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबतची खबर ऋषिकेश रामदास मस्तूद (रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी दिल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. ते सोनवणे यांचे भाऊ असून, गुरुवारी दुपारी ते बहिणीला भेटायला सोनेसांगवी येथे आले होते. तिची भेट घेऊन मांडवगण येथे गेल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास बहिणीने ती चालवीत असलेल्या हॉटेलमध्ये गळफास घेतल्याचे समजल्यावर ते पुन्हा सोनेसांगवी येथे आले. तथापि, सोनवणे यांना शिरूरमधील खासगी रूग्णालयात नेल्याचे समजल्यावर ते शिरूरला आले. तेव्हा सोनवणे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे व त्यांच्या गळ्याला फास बसल्याचे त्यांना रुग्णालयातून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00337 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top