फलके यांच्या आंदोलनाला यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फलके यांच्या आंदोलनाला यश
फलके यांच्या आंदोलनाला यश

फलके यांच्या आंदोलनाला यश

sakal_logo
By

शिरूर, ता. १४ : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या रोजगार, व्यवसायांच्या संधीसह विविध मागण्यांसाठीच्या अविनाश सुभाष फलके यांच्या उपोषण आंदोलनाला शनिवारी (ता. १४) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला. त्यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लगेचच त्यांनी तातडीने प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत चर्चेतून तोडगा काढण्यासाठी बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे फलके यांनी पाचव्या दिवशी उपोषण थांबविले.
फलकेमळा परिसरातील सुमारे एक हजार एकर जमीन औद्योगीकरणासाठी संपादित झालेली आहे. त्यावर उभ्या राहिलेल्या विविध कंपन्यांतून रोजगारासह विविध व्यवसायांच्या संधींपासून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप करीत फलके यांनी मंगळवारपासून (ता. १०) फलके मळा येथे मौन धारण करून उपोषण सुरू केले होते. दरम्यान, पाच दिवस उलटूनही एमआयडीसी प्रशासन, कंपनी व्यवस्थापनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने व त्यातच फलके यांची प्रकृती खालावत चालल्याने शुक्रवारी हिरामण फलके, बापू फलके, तेजस फलके, रवींद्र फलके, चेतन फलके आदींसह स्थानिक ग्रामस्थांनी राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेऊन आंदोलनाबाबत व
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. अण्णांनी या आंदोलनाची दखल घेत तातडीने पी. अन्बलगन यांच्याशी संपर्क साधून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणल्या. कंपनी प्रशासन व प्रकल्पग्रस्तांमध्ये समन्वय साधण्यास आपण प्राधान्य देऊ, त्याअनूषंगाने तातडीने एकत्रित मिटींग लावू व प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत गांभीर्याने चर्चा घडवून आणू, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर अविनाश फलके यांनी रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे व ज्येष्ठ नागरिक नानाभाऊ फलके यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण थांबविले.
जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, कर्डेलवाडीचे सरपंच राजेंद्र दसगुडे, बाभुळसरचे माजी सरपंच दशरथ फंड, तुषार नवले, शहाजी तळेकर, सयाजी नवले आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00338 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top