महामानवांवरील शाहिरीने रंगला जलसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामानवांवरील शाहिरीने रंगला जलसा
महामानवांवरील शाहिरीने रंगला जलसा

महामानवांवरील शाहिरीने रंगला जलसा

sakal_logo
By

शिरूर, ता. १९ : येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त रंगलेल्या शाहिरी जलश्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि माता रमाई ही महान व्यक्तिमत्त्वे रंगमंचावर अवतरली अन् टाळ्यांचा गजर करणाऱ्या प्रेक्षकांचे या महामानवांप्रती नकळत हात जोडले गेले.
महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीने आयोजिलेल्या सोहळ्यात, महापुरुषांच्या वेशातील कलाकारांच्या उपस्थितीत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संभाजी महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांनाही उपस्थितांनी अभिवादन केले. बुद्धवंदना व शिववंदनेने सोहळ्यास सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विनोद भालेराव, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, दलितमित्र रमेश गायकवाड, उद्योजक किरण पठारे, माजी नगरसेविका ॲड. माया गायकवाड, युवा नेते सागर नरवडे, सागर सातारकर आदी यावेळी उपस्थित होते. स्टार प्रवाहवरील ''मी होणार सुपरस्टार : छोटे उस्ताद'' मधील उपविजेता सार्थक शिंदे व सहजिल्हानिबंधकपदी बढती मिळाल्याबद्दल सुनील चाबुकस्वार यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
शाहीर सीमाताई पाटील यांनी शाहिरी जलश्यात अत्यंत तडफदारपणे पोवाडा, भीमगीते व शिवगीते सादर केली. सिद्धार्थ जाधव यांच्या भीमगीतांवरही उपस्थितांनी ठेका धरला. तर बहारदार नृत्ये, कव्वाली, कबीराचे दोहे, काव्यवाचनातून हा जलसा रंगला.

सोहळ्याचे मनोज गाडेकर, विनोद शिंदे, प्रमोद गायकवाड, रामभाऊ झेंडे, नितीन काळे, मयूर भोसले, कौस्तुभ उबाळे, कुणाल गायकवाड, आदित्य उबाळे यांनी संयोजन केले.

00560, 00562

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00342 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top