बलात्कारप्रकरणी एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्कारप्रकरणी एकाला अटक
बलात्कारप्रकरणी एकाला अटक

बलात्कारप्रकरणी एकाला अटक

sakal_logo
By

शिरूर, ता. २४ ः कामावरून घरी परतणाऱ्या मजूर महिलेवर बलात्कार करणाऱ्या ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील सुरेश विश्वनाथ शिंदे याला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः संबंधित चाळीसवर्षीय महिला मजुरीचे काम करते. रविवारी रात्री नऊच्या सुमारास आपले काम संपवून ती घरी निघाली असताना ढोकसांगवी येथील मशिदीच्या रस्त्यावर सुरेश शिंदे याने महिलेला अडविले. जीवे मारण्याची धमकी देऊन रस्त्याकडेला असलेल्या छोट्या पुलाजवळ नेऊन, तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत सुरेश शिंदे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शिरूर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00354 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top