घोडगंगाच्या आखाड्यात विरोधकांची जुळवाजुळव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडगंगाच्या आखाड्यात विरोधकांची जुळवाजुळव
घोडगंगाच्या आखाड्यात विरोधकांची जुळवाजुळव

घोडगंगाच्या आखाड्यात विरोधकांची जुळवाजुळव

sakal_logo
By

शिरूर, ता. २८ : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजताच तालुक्याच्या राजकीय पटलावर हालचालींना वेग आला आहे. गेली २५ वर्षे कारखान्यावर वर्चस्व ठेवलेले आमदार ॲड. अशोक पवार यांच्या रणनितीला भेदण्यासाठी विरोधकांची जुळवाजुळव सुरू आहे.

कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने कारखान्याची खालावत चाललेली स्थिती, ऊस गाळपासह विविध आव्हानांचा डोंगर, कामगारांचे रखडलेले पगार, उसाला मिळणारा कमी बाजारभाव, अध्यक्षांकडून खासगी साखर कारखान्याला दिले जाणारे बळ आणि एकूणच त्यांच्या कारभाराचा ठोकताळा मांडत विरोधकांनी आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परिणामी राजकारण तापू लागले आहे.
घोडगंगाच्या आखाड्यातील आमदार पवार यांचे विरोधक व कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी सर्वपक्षीय विरोधकांना एका छत्राखाली आणून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र सद्यःस्थितीत तालुक्यातील विरोधी पाया खिळखिळा आहे. यापरिस्थितीत दादा पाटील फराटे हे विजयध्वजाची मुहूर्तमेढ कशी रोवणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. विरोधकांचे ‘आस्ते कदम’ चालू असून सर्वपक्षीय नाराज नेत्यांची छुपी रसद मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. फराटे यांची प्रतिमा सहकारातील जाणकार अशी असली तरी राजकारणातील धरसोडीच्या वृत्तीची त्यांना किनार आहे. सत्ताधाऱ्यांवर आक्षेपाचे अनेक मुद्दे असलेतरी विरोधकांकडे नेमके धोरण दिसत नाही. कारखाना डबघाईला आला असल्याची ओरड करताना तो सुस्थितीत आणण्यासाठीचा ठोस कार्यक्रम काय, हे सांगितले जात नाही. कारखाना कर्जबाजारी असल्याचा डांगोरा पिटताना तो कर्जमुक्त करण्याबाबतचे उपाय काय, याबद्दल सभासद मतदारांना पटतील असे मुद्दे मांडले जात नाहीत. मात्र प्रत्यक्ष लढाईला अजून वेळ आहे. तोपर्यंत विरोधकांना एकदिलाने एकत्र येण्याची गरज आहे. तसे झाले तर खऱ्या अर्थाने सामना रंगू शकेल.

PNE22S67480
PNE22S67492

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00362 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top