कंटेनरच्या धडकेत मोटारीचा चक्काचूर कंटेनरच्या धडकेत मोटारीचा चक्काचूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंटेनरच्या धडकेत मोटारीचा चक्काचूर
कंटेनरच्या धडकेत मोटारीचा चक्काचूर
कंटेनरच्या धडकेत मोटारीचा चक्काचूर कंटेनरच्या धडकेत मोटारीचा चक्काचूर

कंटेनरच्या धडकेत मोटारीचा चक्काचूर कंटेनरच्या धडकेत मोटारीचा चक्काचूर

sakal_logo
By

शिरूर, ता. २६ : भरधाव जाणाऱ्या कंटेनरने पुढे जाणाऱ्या मोटारीला ठोकरले. ही ठोकर एवढी जोराची होती की मोटार रस्ता दुभाजकावरून पलीकडच्या बाजूला गेली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकची पुढील बाजूस धडक बसली. या धडकेत मोटारीचा चक्काचूर होऊन मोटारीतील एक महिला जागीच ठार झाली तर चालक गंभीर जखमी झाला. पुणे - नगर रस्त्यावर रांजणगाव एमआयडीसीजवळ शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला.
लीलाबाई बबन काळे (वय ६७) या मोटारीतील महिला या अपघातात मृत्युमुखी पडल्या तर मोटार चालविणारा त्यांचा मुलगा दिलीप बबन काळे (वय ४२, दोघे रा. मोशी प्राधिकरण, पुणे) हे गंभीर जखमी झाले. या अपघातप्रकरणी मारुती माधव कलाल (रा. जांब, ता. मुखेड, जि. नांदेड) या कंटेनर चालकाविरुद्ध व विनोद भाटू राठोड (रा. रूई, ता. जि. यवतमाळ) या ट्रकचालकाविरूद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
.
00676

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00410 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top