दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांवरच हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांवरच हरकती
दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांवरच हरकती

दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांवरच हरकती

sakal_logo
By

शिरूर, ता. १ : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांच्या छानणीदरम्यान शुक्रवारी (ता. १) सत्ताधारी व विरोधी पॅनेलच्या प्रमुखांवरच परस्परविरोधी हरकती घेतल्या गेल्याने निवडणूक कार्यालय परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला. दरम्यान, पोलिस बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत हरकतींबाबत सुनावणी घेण्यात येत होती. आक्षेपांबाबत सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल देणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष आमदार ॲड. अशोक पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार व मुलगा ऋषिराज पवार यांच्या उमेदवारी अर्जांवर विरोधकांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेलने हरकती नोंदविल्या, तर विरोधी पॅनेलची जुळवाजुळव करण्यात पुढाकार घेणारे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे व भाजप किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब खळदकर यांच्या उमेदवारी अर्जांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आक्षेप घेण्यात आले.
या पाच उमेदवारी अर्जांच्या हरकतीबाबत दाखल पुराव्यांच्या आधारे उशिरापर्यंत निवडणूक कार्यालयात छाननी चालू होती. पाचही उमेदवारांबरोबरच हरकत घेणारांचे म्हणणेही निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी ऐकून घेतले. मात्र, उशिरापर्यंत याबाबतचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. हरकतींचे पडसाद निवडणूक कार्यालयाबाहेरही उमटले. यावेळी परस्परांत बाचाबाची झाली. त्यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

हे आहेत आक्षेप
अशोक पवार यांनी कारखान्याची जागा स्वतःच्या शिक्षण संस्थेच्या शाळेला दिली असून, त्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा, तर सुजाता पवार व ऋषिकेश पवार यांच्या नावे असलेली जमीन व्यंकटेश कृपा शुगर मिल या खासगी साखर कारखान्याच्या कर्जासाठी तारण ठेवली असल्याचे आक्षेप काकासाहेब खळदकर, वीरेंद्र शेलार, शिवाजी शेलार व ठकसेन ढवळे यांनी नोंदविला. तर, दादा पाटील फराटे हे सहकारी बॅंकेचे थकबाकीदार असल्याने त्यांना मांडवगण फराटा सोसायटीची म्हणजे सहकारातील निवडणूक लढविण्यास बंदी असल्याने तोच नियम घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीतही लागू होतो. तसेच, विरोधी पॅनेलमधील प्रमुख उमेदवार काकासाहेब खळदकर यांचा सलग तीन वर्षे कारखान्याला ऊस आलेला नसल्याने ते निवडणूक पात्र नसल्याचा आक्षेप संभाजी शिवाजी फराटे इनामदार व उमेश सुदाम साठे यांनी घेतला.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00416 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..