रांजणगाव एमआयडीसीत १० लाखाची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांजणगाव एमआयडीसीत १० लाखाची चोरी
रांजणगाव एमआयडीसीत १० लाखाची चोरी

रांजणगाव एमआयडीसीत १० लाखाची चोरी

sakal_logo
By

शिरूर, ता. ८ ः रांजणगाव एमआयडीसीतील डॉन कॉंग कंपनीतील टूल रूम मधून कंपनीतील महत्त्वाच्या मशिनचे सुमारे दहा लाख रुपये किंमतीचे सुटे पार्ट चोरीला गेल्याचा प्रकार आज उघडकीस आला. २७ जुलैच्या मध्यरात्री हा धाडसी चोरीचा प्रकार घडल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरून सिद्ध झाले.
डॉन कॉंग कंपनीचे प्रतिनिधी मंगेश नारायण देशमुख (रा. शिरूर, मूळ रा. शिरसगाव देशमुख, ता. खामगाव, जि. बुलडाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः गेल्या सोमवारी (ता. २७ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने कंपनीच्या मागील संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. त्याबाजूच्या उघड्या दरवाजातून कंपनीत प्रवेश करून त्याने व्हीएमसी मशिनजवळील चावीने टूलरूम उघडून व्हीएमसी मशिनचे वेगवेगळ्या साईजचे दोन लाख २७ हजार ३३५ रूपये किमतीचे कटर टूल बॉडी, दोन लाख ३७ हजार पाचशे ११ रुपये किमतीचे याच मशिनचे ९५ कारबाईड, पाच लाख २७ हजार ७६९ रुपये किमतीच्या इतर मशिनरी चोरून नेल्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00429 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..