सराफाला खंडणी मांडणारा जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराफाला खंडणी मांडणारा जेरबंद
सराफाला खंडणी मांडणारा जेरबंद

सराफाला खंडणी मांडणारा जेरबंद

sakal_logo
By

शिरूर, ता. ८ ः येथील सराफाला डी. के. ग्रुप च्या नावे धमकी देऊन एक कोटी रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले.
राहुल सुखदेव गायकवाड (रा. कोहकडी, ता. पारनेर, जि. नगर) असे या खंडणीखोराचे नाव आहे. त्याने वारीला जाणाऱ्या एका वारकऱ्याचा मोबाईल चोरून त्यावरून शिरूर मधील सराफाशी संपर्क साधून एक कोटी रुपयांची मागणी केली होती. ग्रुपच्या व स्वतःच्या खर्चासाठी खंडणीची मागणी करणाऱ्या गायकवाडने खंडणी न दिल्यास कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकीही सराफाला दिली होती.
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक अशोक शेळके, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, मंगेश थिगळे, मुकुंद कदम या पथकाने घटनेच्या मुळाशी जाऊन ज्या मोबाईलवरून धमकी दिली त्या मोबाईलधारकाचा शोध घेतला. तांत्रिक माहितीच्या आधारे या चोरीच्या मोबाईलचा कुठे व कसा वापर केला गेला याची माहिती मिळवत पथक राहुल गायकवाड याच्यापर्यंत पोचले. गायकवाड याच्यावर यापूर्वी शिरूर, शिक्रापूर, पारनेर, सुपा, श्रीगोंदा या पोलिस ठाण्यांमध्ये नऊ गुन्हे दाखल असून, दीड वर्षांपासून तो फरारी होता, अशी माहिती शेळके यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00431 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..