पवार बंधूंच्या हॉटेलांचा शाही थाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवार बंधूंच्या हॉटेलांचा शाही थाट
पवार बंधूंच्या हॉटेलांचा शाही थाट

पवार बंधूंच्या हॉटेलांचा शाही थाट

sakal_logo
By

पवार बंधूंच्या हॉटेलांचा शाही थाट

शिरूरच्या पवार भावंडांनी एका छोट्याशा टपरीतून सुरू केलेल्या हॉटेल व्यवसायाचा आज वटवृक्ष झाला असून, अथक परिश्रमातून त्यांनी एक-दोन नव्हे; तर तब्बल सहा हॉटेलची साखळी गुंफली आहे.

म्हणतात ना, आकाशाला गवसणी घालावी; पण जमिनीवरील घट्ट पायांची पकड सुटू देऊ नये. यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करताना शिरूरच्या शरद संपतराव पवार यांनी हे तत्त्व जीवापाड जपले आहे. सचिन आणि सनी या भावांना सोबत घेऊन त्यांनी हॉटेल व्यवसायात स्वतःचा खास ब्रॅण्ड तयार केला आहे. तिघा भावांनी एका छोट्याशा टपरीतून सुरू केलेल्या या हॉटेल व्यवसायाचा आज वटवृक्ष झाला असून, अथक परिश्रमातून त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल सहा हॉटेलची साखळी गुंफली आहे.
पुणे-नगर रस्त्यावरील बोऱ्हाडे मळ्यातील ‘हॉटेल वैभव’ व ‘हॉटेल सद्‍गुरू वडेवाले’, शिरूर शहरातील ‘हॉटेल सद्‍गुरू प्युअर व्हेज’, शिरूर बायपासवरील ‘कल्याणी थाळी’, बेंगलोरच्या नर्सापूर इंडस्ट्रिअल एरियातील ‘सद्गुरू प्युअर व्हेज’ या साखळीनंतर पुणे-नगर महामार्गावरील ‘हॉटेल कल्याणी व्हेज, नॉनव्हेज व मल्टी क्यूझिन रेस्टॉरन्ट’च्या माध्यमातून या हॉटेल व्यवसायाचा कळसाध्याय झाला आहे. अनेक मित्रमंडळींचे मनापासूनचे सहकार्य, आई-वडीलांचे आशीर्वाद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रविकांत वर्पे, श्‍यामकांत वर्पे व विक्रम वर्पे या मामांचे या भाचेकंपनीला असलेले मार्गदर्शन व संपूर्ण पाठबळ यातूनच शरद पवार यांनी हॉटेल व्यवसायात नेत्रदीपक प्रगती साधली आहे.
सामान्य कुटुंबातील शरद पवार यांनी प्रतिकूल परिस्थितीत जास्त शिक्षण घेता आले नसतानासुद्धा कर्तबगारी, कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. ऐन तारूण्यात पडेल ती कामे करून त्यांनी आई-वडीलांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. कुठलेही काम छोटे नसते, तर ते आपण करताना त्यात किती योगदान देते, यावर त्याचे मूल्य अवलंबून असते, हे तत्त्व मानून त्यांनी सन २००७ मध्ये रांजणगाव एमआयडीसीत हॉस्पिटॅलिटी आणि इंडस्ट्रिअल केटरिंगचा व्यवसाय सुरू केला. वर्षभरातच या व्यवसायातील सर्व बारीक-सारीक माहिती आत्मसात करून स्वतःचे हॉटेल सुरू केले. पुढे हळूहळू व्यवसाय पुढे नेताना सन २०१२ ला थेट बेंगलोरपर्यंत हॉटेल व्यवसायाचा विस्तार केला.
पुणे-नगर रस्त्यावरील चोखंदळ खवय्यांच्या सेवेत ‘सद्‍गुरू वडेवाले’ व ‘हॉटेल कल्याणी’ची मुहूर्तमेढ रोवली. महामार्गावर असूनही निसर्गरम्य सान्निध्य लाभलेल्या या हॉटेलचा शाही थाट येणारा-जाणारांचे सहज लक्ष वेधून घेतो. चारशे लोक एकावेळी बसून जेवण करू शकतील, असे हे हॉटेल आहे. सर्व सोयीसुविधांयुक्त या हॉटेललगत तब्बल दहा हजार चौरस फुटांचे प्रशस्त पार्कींग असून, भारतीय बैठक, सोफा-टेबल, खुर्ची-टेबल, अशी स्वतंत्र दालनांतून स्पेशल आसनव्यवस्था आहे. प्रशिक्षित स्टाफ ही खासियत असलेल्या या हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी खास लेडीज व्यवस्थापन आहे. होम मेड मसाले आणि घरगुती मेनू या वैशिष्ट्यांसह चिकन रान, मटन रान, चिकन तंदूरी, बार्बेक्यू लाईव्ह नॉन व्हेज प्लॅटरने खवय्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले असून, चुलीवरील घरगुती पद्धतीने बनविलेले चिकन, मटन, रस्सा-भाकरी तसेच इंडियन, चायनीज, पंजाबी व महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण आणि सोबत दर शुक्रवारी व रविवारी खवय्यांच्या मनोरंजनासाठी सुगम संगिताचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00462 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top