शंतनूभय्याच्या कर्तबगारीचा शिरूरमध्ये ठसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंतनूभय्याच्या कर्तबगारीचा शिरूरमध्ये ठसा
शंतनूभय्याच्या कर्तबगारीचा शिरूरमध्ये ठसा

शंतनूभय्याच्या कर्तबगारीचा शिरूरमध्ये ठसा

sakal_logo
By

शंतनूभय्याच्या कर्तबगारीचा शिरूरमध्ये ठसा

आजी (स्व.) पार्वतीकाकू खांडरे, आई सौ. अलकाताई खांडरे यांच्या सेवेच्या पंरपरेचा पाईक होण्यास सज्ज झालेल्या शंतनू सुरेश खांडरे ऊर्फ भय्या सराफ यांच्या तन-मन-धन अर्पून चालू असलेल्या समाजकार्याचा शिरूरमध्ये सर्वत्र बोलबाला होताना दिसत आहे.

प्रभू श्री रामलिंगांच्या पावनभूमीत अर्थात शिरूर नगरीत अनेक घराणी आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि कर्तबगारीने लौकिकास प्राप्त झाली आहेत. याच घराण्यांपैकी खांडरे परिवार हा शहरातील सामाजिक-राजकीय घटकांमधील एक अविभाज्य भाग आहे. याच खांडरे परिवारातील शंतनू सुरेश खांडरे ऊर्फ भय्या सराफ हे युवा नेतृत्व आता नगरीचा सामाजिक-राजकीय अवकाश व्यापण्यास सज्ज झाले असून, अल्पवयातील आपल्या कार्यकर्तृत्वातून त्यांच्या कार्याचा आलेख सातत्याने उंचावताना दिसत आहे.
शंतनूभय्याच्या आजी पार्वतीकाकू यांनी शिरूर नगरीच्या नगरसेविका म्हणून मोठे योगदान दिले, तर मातोश्री सौ. अलकाताई यांनी त्यांच्याही पुढे एक पाऊल टाकीत सलग दोनदा नगरीचे उपनगराध्यक्षपद भूषविले. या दोघींनीही नगरीच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनमान सुधारण्याच्या कर्तव्यात मोलाचे योगदान दिले असताना आता शंतनूभय्या देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सेवेची ही परंपरा पुढे चालविण्यास सज्ज झाले आहेत.
शिरूर नगरीचे सर्वेसर्वा, जगप्रसिद्ध उद्योगपती (स्व.) रसिकभाऊ धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अलकाताई यांनी आपल्या उपनगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे यशस्वीपणे राबविली. निरपेक्षवृत्तीने शहर सुधारणाकामी योगदान दिले. नगरीच्या मध्यवर्ती भागात उभे राहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ही त्यांच्या सेवाभावी कार्याची पोचपावतीच आहे.
गेले वीस वर्षे नगरीचे अत्यंत यशस्वीपणे नेतृत्व करणारे नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले शंतनूभय्या अनेक सामाजिक कार्यातून आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहेत. टपाल खात्याने नुकत्याच सुरू केलेल्या चारशे रुपयात दहा लाखाचा विमा या महत्वाकांक्षी योजनेचा आपल्या प्रभागातील हजारो नागरीकांना लाभ मिळवून देताना मोठी रक्कम त्यांनी स्वतःच्या खिशातून भरली आहे. वडील सुरेश (नाना) खांडरे हे श्री शिवसेवा मंडळाचे विश्वस्त म्हणून धार्मिक-सामाजिक कार्यात कार्यरत असताना आई-वडिलांची हीच उज्ज्वल परंपरा पुढे चालविण्याचा शंतनूभय्याचा मानस आहे.
व्यावसायिक पातळीवरदेखील त्यांनी आपल्या नावाचा, कर्तबगारीचा ठसा उमटविला आहे. वडिलोपार्जित सुवर्णपेढी अत्यंत सचोटीने, प्रामाणिक प्रयत्नांतून नावारूपाला आणताना त्यांनी हॉटेलसारख्या जोखमीच्या व्यवसायात पदार्पण केले आहे. ‘सिल्व्हर स्पून’ या ब्रॅण्डच्या माध्यमातून चोखंदळ शिरूरकरांना शुद्ध शाकाहारी जेवण, स्वच्छ, सुरक्षित अन मोकळ्या वातावरणात मिळावे, यासाठी त्यांनी शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर आलिशान हॉटेल थाटले आहे. वैविध्यपूर्ण पदार्थांची गुणवत्ता, कर्मचारी वर्गाचा सेवाभाव आणि शंतनूभय्याच्या आदरातिथ्यामुळे अल्पावधीतच या हॉटेलची शिरूर, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांबरोबरच जिल्हाभर ख्याती पसरली आहे.
सराफीसोबतच हॉटेल व्यवसाय नावारूपाला आणताना सामाजिक बांधिलकीतून ते शिरूर परिसरातील निराधार, मूकबधिर, अनाथांच्या संस्थांना सातत्यपूर्ण मदत करीत असतात. ‘शंतनूभय्या खांडरे युवामंच’च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.

००७५६

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00463 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..