
शिरूरला पाच ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
शिरूर, ता. ३ : शिरूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी (ता. ४) मतदान होत असून, शुक्रवारी (ता. ५) मतमोजणी होणार आहे.
टाकळी हाजी या मोठ्या ग्रामपंचायतीतून माळवाडी व म्हसे बुद्रुक; तर जांबूतमधून शरदवाडी ही गावे विभक्त झाल्याने तेथे नव्याने ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. त्यामुळे टाकळी व जांबूत वगळता इतर ठिकाणी प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. जुन्या जाणत्यांबरोबरच आता युवा नेतृत्वालाही ‘गावकारभारी’ होण्याचे डोहाळे लागल्याने या पाचही ठिकाणच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाल्याचे चित्र होते. गावपातळीवरील या निवडणुकीसाठी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करण्यात आला, तर काही ठिकाणी चक्क सिनेकलाकारांनीही प्रचाराच्या निमित्ताने हजेरी लावली.
पूर्व भागातील तांदळी ग्रामपंचायतीसाठी कधी नव्हे ती चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजपचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे व घोडगंगा साखर कारखान्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संचालक प्रा. सुभाष कळसकर यांच्या पॅनेलमध्ये या ठिकाणी निवडणूक होत आहे.
जांबूतच्या सरपंच जयश्री जगताप व बाळासाहेब बदर यांच्या पॅनेलसमोर माजी सरपंच बाबासाहेब फिरोदिया व बाळासाहेब फिरोदिया यांच्या समर्थकांच्या पॅनेलने कडवे आव्हान उभे केले आहे. माळवाडीत गेले चाळीस वर्षांहून अधिक काळ टाकळी हाजी ग्रामपंचायतीचे तीन वॉर्ड होते. आता या तीन वॉर्डची स्वतंत्र ग्रामपंचायत झाली असून, तेथे सोपानराव भाकरे व सोमनाथ भाकरे या गावडे समर्थकांतच जुंपली आहे. म्हसे बुद्रूक येथे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या पॅनेलला दामूशेठ घोडे व काळूराम पवार यांच्या पॅनेलने यांनी टक्कर दिली आहे.
या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00483 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..