चुलत्याचे हातपाय मोडण्याची शेतजमिनीच्या वादातून सुपारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुलत्याचे हातपाय मोडण्याची 
शेतजमिनीच्या वादातून सुपारी
चुलत्याचे हातपाय मोडण्याची शेतजमिनीच्या वादातून सुपारी

चुलत्याचे हातपाय मोडण्याची शेतजमिनीच्या वादातून सुपारी

sakal_logo
By

शिरूर, ता. ३ : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून एका तरुणाने वकील असलेल्या चुलत्याचे हातपाय मोडण्याची सुपारी दिल्याचा प्रकार रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे उघडकीस आला. याप्रकरणी कुठलेही धागेदोरे नसताना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सात तरुणांना अटक केली व त्यांच्याविरुद्ध संगनमताने हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला.
ॲड. हनुमंत अंकुश टाकळकर (रा. टाकळकरवाडी, ता. शिरूर) हे या हल्ल्यात जखमी झाले असून, हल्लेखोरांनी दहशत माजविण्यासाठी त्यांची मोटारही दांडके व दगडगोटे टाकून फोडली. रांजणगावजवळील हॉटेल धनगरवाडा परिसरात २६ जुलैला रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारातील हल्लेखोरांची ओळख न पटल्याने हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत स्थानिक पोलिस पथकाला कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रेय शिंदे, उमेश कुतवळ, विजय शिंदे यांनी गेले काही दिवस घटनास्थळी पाळत ठेवली. त्यातून हल्लेखोरांचे धागेदोरे हाती लागताच प्रथम हर्षल सुभाष कोहकडे व प्रज्ज्वल दत्तात्रेय सातकर (दोघे रा. कारेगाव, ता. शिरूर) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता वैभव अप्पा टाकळकर (रा. टाकळकरवाडी) याच्या सांगण्यावरून व त्याने दिलेल्या पन्नास हजार रुपयांच्या मोबदल्यात अभय अनिल टिंगरे (रा. टाकळकरवाडी), संकेत गुजर, अभी पवार, गौरव कराळे (पूर्ण नावे व पत्ते उपलब्ध नाहीत) यांनी ॲड. टाकळकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची व त्यांची गाडी फोडल्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिस पथकाने वैभव टाकळकर याच्यासह सर्व हल्लेखोरांची धरपकड केली. वडिलोपार्जित शेतजमिनीचा वाद चालू होता. त्यातूनच चुलत्यावर हल्ल्याची सुपारी दिल्याची कबुली त्याने दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00486 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..