शिरूरच्या २२ गावांत दूषित पाणी पुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरच्या २२ गावांत दूषित पाणी पुरवठा
शिरूरच्या २२ गावांत दूषित पाणी पुरवठा

शिरूरच्या २२ गावांत दूषित पाणी पुरवठा

sakal_logo
By

शिरूर, ता. ११ : शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील २२ गावांतील पाण्याचे नमुने जून महिन्यात दूषित आल्यानंतर जुलै महिन्यातही तब्बल बारा गावांतील पाण्याचे नमुने दूषित आले असून, हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष तपासणी अहवालातून निघाला.
शिरूर तालुक्यातील विविध गावांतून पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यानंतर पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत जून महिन्यात २५१ ठिकाणच्या जलस्रोतांचे; तर जुलैमध्ये १८२ ठिकाणच्या जलस्रोतांचे नमुने घेऊन ते पुण्यातील राज्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यातून जूनमध्ये कोंढापुरी, कासारी, डिंग्रजवाडी, विठ्ठलवाडी, वाडा पुनर्वसन, दरेकरवाडी, मिडगुलवाडी, पाबळ, करंदी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, धामारी, पिंपळे जगताप, वढू बुद्रूक, खैरेनगर, केंदूर, रावडेवाडी, चांडोह, निर्वी, निमोणे, मोटेवाडी, कोळगाव डोळस या गावांतील; तर जुलै महिन्यातील अहवालानुसार, शिक्रापूर, राऊतवाडी, कासारी, विठ्ठलवाडी, गोलेगाव, करडे, कर्डेलवाडी, इनामगाव, पिंपळसुटी, वडगाव रासाई, मिडगुलवाडी व चिंचोली मोराची या महत्त्वाच्या आणि मोठ्या गावांबरोबरच या गावांतील अनेक वाड्या-वस्त्यांवरील पाणी दूषित झाल्याचा अहवाल पंचायत समितीला प्राप्त झाला.

पाण्याचे अहवाल दूषित आलेल्या गावांतील ग्रामस्थांनी पाणी गाळून व उकळून आणि महत्त्वाचे म्हणजे टीसीएल पावडर वापरून पिणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींनीही दूषित पाणी स्रोतांचे तत्काळ शुद्धीकरण करावे. टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होत असल्यास टॅंकरच्या टाकीचे नियमीत शुद्धीकरण करावे. पाणी उद्भवांचे नियमीत ३३ टक्के क्लोरिनयुक्त टीसीएलचा वापर करून शुद्धीकरण करावे.
- अजित देसाई, गटविकास अधिकारी, शिरूर

पाण्याचे नमुने दूषित आले असले; तरी त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. काळजी घेणे, खबरदारी घेणे गरजेचे आहे. जलस्रोतांचे तपासलेले नमुने तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. कायमस्वरूपी दूषित पाणी असलेल्या जलस्त्रोतांना आम्ही रेड मार्क करतो. तशी स्थिती शिरूर तालुक्यात कुठेही नाही. औद्योगिक वसाहतींच्या परिसरातील किंवा पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आला असेल, अशा ठिकाणी तातडीच्या उपाययोजना केल्या जातील.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00507 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..