शिरूरमध्ये मेटेना वाहिली श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरमध्ये मेटेना वाहिली श्रद्धांजली
शिरूरमध्ये मेटेना वाहिली श्रद्धांजली

शिरूरमध्ये मेटेना वाहिली श्रद्धांजली

sakal_logo
By

शिरूर, ता. १६ : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आयुष्य वेचले. आरक्षणासाठी सर्व समाजबांधवांनी संघटित होणे, समाज एकवटणे हीच त्यांना सार्थ आदरांजली ठरेल, असे सांगत शिरूर येथे समाजबांधवांसह सर्वधर्मीय नागरिक, विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मेटे यांना श्रद्धांजली वाहिली.
शिरूर नगर परिषदेच्या जुन्या कार्यालयाजवळ त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, समस्त सकल मराठा संघाचे अध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ, उद्योजक किरण पठारे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, भाजपचे तालुका संपर्कप्रमुख बाबूराव पाचंगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, कार्याध्यक्ष हाफीज बागवान, आपचे शहराध्यक्ष अनिल डांगे, माजी नगरसेवक प्रवीण दसगुडे, संभाजी कर्डिले, तुकाराम खोले, कानिफनाथ वाखारे, योगेश महाजन, सागर नरवडे, राहील शेख, जयवंत साळुंके, अविनाश जाधव, रूपेश घाडगे, ॲड. रवींद्र खांडरे आदी यावेळी उपस्थित होती.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00515 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..