शिरूरमध्ये पाचर्णे यांचे स्मारक असावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरमध्ये पाचर्णे यांचे स्मारक असावे
शिरूरमध्ये पाचर्णे यांचे स्मारक असावे

शिरूरमध्ये पाचर्णे यांचे स्मारक असावे

sakal_logo
By

शिरूर, ता. २० : माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे शिरूर शहर व तालुक्याच्या विकासात मोठे योगदान असल्याने त्यांचे शहरात मध्यवर्ती ठिकाणी उचित स्मारक असावे, अशी अपेक्षा शिरूर येथे झालेल्या पाचर्णे यांच्या श्रद्धांजली सभेत व्यक्त केली. पाचर्णे यांचा शहरात पुतळा उभारण्याची व शहरातून त्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गाला त्यांचे नाव देण्याची मागणीही यावेळी केली.
पाचर्णे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजिलेल्या सर्वपक्षीय शोकसभेसाठी माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग थोरात, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘‘थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा, अशी पाचर्णे यांची खूप तळमळ होती व त्यासाठी ते मला मी सहकार मंत्री असताना अनेकदा भेटले. शेतकरी समाजाविषयी खरी आस्था असणारे ते लोकप्रतिनिधी होते.’’ आमदार पवार म्हणाले, ‘‘राजकारणात वाटा वेगळ्या झाल्यानंतरही आम्ही परस्पर संबंधात कधी कटुता येऊ दिली नाही. कधीही खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका केली नाही. आमचे सौहार्दपूर्ण संबंध होते.’’
उद्योजक किरण पठारे, शिरूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र सावंत, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेव घावटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नाना पोटे, अल मदद बैतुल माल कमिटीचे अध्यक्ष फिरोज बागवान, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र सानप, नगरसेवक विनोद भालेराव, शिरूर तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार, ॲड. सुरेश पलांडे, अनिल काशीद, रमणलाल भंडारी, ॲड. प्रदीप बारवकर, ॲड. किरण आंबेकर, उमेश शेळके, सागर नरवडे, प्रमोद जोशी, फिरोज सय्यद, नितीन काळे, प्रकाश बाफणा, ॲड. माया गायकवाड, आशिष शिंदे, प्र. रा. वळसंगे, कानिफनाथ वाखारे, राम कदम, सुनील चौधरी, पोपट ओस्तवाल आदींची यावेळी श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
भाजपचे तालुका संपर्क प्रमुख बाबूराव पाचंगे यांनी प्रास्ताविक; तर जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. सकल मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ यांनी आभार मानले.