पाचर्णे यांच्या कुटुंबीयांसाठी पंतप्रधानांकडून शोकसंदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचर्णे यांच्या कुटुंबीयांसाठी
पंतप्रधानांकडून शोकसंदेश
पाचर्णे यांच्या कुटुंबीयांसाठी पंतप्रधानांकडून शोकसंदेश

पाचर्णे यांच्या कुटुंबीयांसाठी पंतप्रधानांकडून शोकसंदेश

sakal_logo
By

शिरूर, ता. २५ : माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, लोककेंद्रीत समस्यांसाठी कायमच उठणारा आवाज त्यांच्या जाण्यामुळे हरपल्याचा संदेश पाठवीत पाचर्णे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
पाचर्णे यांचे ११ ऑगस्टला दीर्घ आजाराने निधन झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पाशा पटेल, महादेव जानकर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांनी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाचर्णे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी पाचर्णे यांच्या पत्नी मालती यांना वैयक्तिकरित्या शोकसंदेश पाठविला असून, त्यात पाचर्णे यांच्या निधनाबद्दल अतीव दुःख झाल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरवातीलाच पाचर्णे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाचर्णे यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरही प्रकाशझोत टाकला.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00547 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..