शिरूरमध्ये साकारला ‘विश्वविनायक राजमहाल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरमध्ये साकारला ‘विश्वविनायक राजमहाल’
शिरूरमध्ये साकारला ‘विश्वविनायक राजमहाल’

शिरूरमध्ये साकारला ‘विश्वविनायक राजमहाल’

sakal_logo
By

शिरूर, ता. ३ : ‘शिरूरचा राजा’ अशी ओळख असलेल्या येथील आझाद हिंद गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीभोवती ''विश्वविनायक राजमहाल'' साकारला असून, सन १९४७ रोजी स्थापन झालेल्या या मंडळाचे यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने राजमहालावर आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.
आझाद हिंद गणेश मंडळ ट्रस्टच्या वतीने ७५ व्या वर्षीच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. या मंडळाचा गणपती मानाचा आहे. सन १९७३रोजी नारायण सागवेकर व बबनराव सागवेकर यांनी शाडूच्या मातीपासून ही मूर्ती घडविली असून, तीच उत्सवात बसविली जाते. नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना केल्यानंतर देखाव्याचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण व नेमीचंद फुलफगर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, नगरसेवक विठ्ठल पवार आदी उपस्थित होते. विश्वविनायक राजमहाल तिरंगी रोषणाईमुळे उजळून निघाला असून गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीपासूनच ही सजावट पाहण्यास खुली केली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शंकरकाका परदेशी यांनी सांगितले. अमृत महोत्सवी उत्सवानिमित्त महिला व विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण होणार असल्याची माहिती सहअध्यक्ष सोमनाथ जगताप यांनी दिली. रविवारी (ता. ४) रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याचे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार असल्याचे मंडळाचे खजिनदार शंतनू खांडरे यांनी सांगितले.
मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद सागवेकर, अजिंक्य सागवेकर यांनी सजावट केली असून, राजमहाल आकर्षक एलईडी दिव्यांनी व फुलांनी सजविला आहे. नेमीचंद फुलफगर, धरमचंद फुलफगर, विलास काळे, शरद कालेवार, नितीन खांडरे हे मंडळाचे सल्लागार व मार्गदर्शन असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सागर जगताप, अजय कोठारी, वर्धमान रुणवाल, सूरज परदेशी, भोला कालेवार, नीलेश खांडरे, शिवा पाथरकर, जितेंद्र खांडरे, दिलीप शेजवळ, आनंद भटेवरा, चेतन जगताप, गणेश परदेशी, निकेत बाफणा हे इतर कार्यक्रम व उपक्रमांचे नियोजन करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00565 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..