शिरूरमधील मारहाणप्रकरणी महिलेसह तिघांविरूद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरमधील मारहाणप्रकरणी 
महिलेसह तिघांविरूद्ध गुन्हा
शिरूरमधील मारहाणप्रकरणी महिलेसह तिघांविरूद्ध गुन्हा

शिरूरमधील मारहाणप्रकरणी महिलेसह तिघांविरूद्ध गुन्हा

sakal_logo
By

शिरूर, ता. ७ : गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून शहरातील पाबळ फाटा परिसरात झालेल्या भांडणप्रकरणी अतुल राजू गव्हाणे (रा. पाबळ फाटा, शिरूर) या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी महिलेसह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
एका महिलेसह लक्ष्मण कुरंदळे व अमित लक्ष्मण कुरंदळे (रा. पाबळ फाटा, शिरूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून, महिलेने स्क्रू ड्रायव्हरने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अतुल गव्हाणे याच्यासोबतचे काही तरूण व इलेक्ट्रीक वस्तूंच्या विक्रीचे दुकान असलेल्या महिलेची गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. यात अतुल गव्हाणे याच्याविरूद्ध विनयभंग व बेकायदा जमाव जमवून मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्याच्या फिर्यादीवरून संबंधित महिलेसह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आई व पत्नी यांनाही मारहाण झाल्याची अतुल गव्हाणे यांची तक्रार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00584 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..