सरदवाडी मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरदवाडी मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी
सरदवाडी मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी

सरदवाडी मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी

sakal_logo
By

शिरूर, ता. ७ : सरदवाडी (ता. शिरूर) येथील शालेय दलित विद्यार्थ्याला व त्याच्या आईला वायरने मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिरूर शहर लहुजी शक्ती सेना व मातंग एकता आंदोलन या संघटनांनी केली. त्यासाठी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
शालेय विद्यार्थी व त्याच्या आईला मारहाण प्रकरणी रंगनाथ कर्डिले व विवेक रंगनाथ कर्डिले (दोघे रा. सरदवाडी) यांच्याविरूद्ध विनयभंग व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, शालेय विद्यार्थिनीच्या छेडछाडीच्या गैरसमजातून त्यांनी प्रतीक अंगद जाधव व त्याची आई निशा अंगद जाधव यांना केबलने मारहाण केली असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच दोघेही फरारी झाले असून, पुढील तपास शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी करीत आहेत.
दरम्यान, लहुजी शक्ती सेनेचे शिरूर शहराध्यक्ष विशाल जोगदंड, नागेश साळवे, मोनिका जाधव, संकेत सुरवसे, नानू भवाळ; तसेच मातंग एकता आंदोलनाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, शहराध्यक्ष सतीश बागवे, संतोष धोत्रे, अविनाश साबळे, श्रीकांत बागवे यांनी शिरूर पोलिसांना निवेदन दिले असून, दहा दिवस उलटूनही यातील आरोपींवर कारवाई न झाल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या. रंगनाथ कर्डिले व विवेक कर्डिले यांनी गैरसमजातून प्रतीक याला केबलने जबर मारहाण केली. त्याची आई त्याला सोडवायला गेली असता तिलाही मारहाण केली.
‘तुम्ही गावात पोट भरायला आले आहात, तर लायकीत राहायचे. मुलाला शाळेतून काढून टाकून तुम्हाला गावातून हाकलून देऊ,’ अशी धमकी दिली असल्याचे विशाल जोगदंड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या दोघांवर कठोर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही जोगदंड व बागवे यांनी दिला.
दरम्यान, लता रंगनाथ कर्डिले (रा. सरदवाडी, ता. शिरूर) यांनीही शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, अल्पवयीन मुलाविरूद्ध शिरूर पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00585 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..