विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी
चौकशी करण्याची मागणी
विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्याची मागणी

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्याची मागणी

sakal_logo
By

शिरूर, ता. ७ : निलोफर निसार खान (वय ३०, रा. येरवडा, पुणे) या विवाहितेच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी तीच्या वडील व भावाने संशय व्यक्त केला असून, कारवाईची मागणी केली आहे. ‘शिरूर शहर मुस्लिम जमात’च्या पदाधिकाऱ्यांनी विवाहितेच्या मृत्युप्रकरणी सखोल चौकशीची मागणी येथे पत्रकार परिषदेत केली.
निलोफर खान यांचा रविवारी (ता. ४) मृत्यू झाला. याबाबत समजल्यावर त्यांचे भाऊ इम्रान हे येरवडा येथे गेले असता निलोफर यांना बेडवर झोपवलेले होते. त्यांचा मुलगा असद (वय ११) याने आईने गळफास घेतल्याचे सांगितल्यावर इम्रान यांनी येरवडा पोलिसांना याबाबत कळविले. त्यांनी घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू, अशी केली.
दरम्यान, निलोफर व निसार खान यांचा विवाह होऊन चार वर्षे झाली होती. पती निसार हे तीला सातत्याने शारीरीक व मानसिक त्रास देत होते, असा आरोप निलोफर यांच्या नातेवाइकांनी केला. याबाबत ‘मुस्लिम जमात’च्या वतीने शिरूर पोलिसांना निवेदन दिले असून, त्यात या घटनेप्रकरणी निसार खान यांची कसून चौकशी करण्याची मागणी केली. ‘मुस्लिम जमात’चे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर, उपाध्यक्ष नसीम खान, आरिफ सय्यद, हुसेन शहा तसेच मृत निलोफर यांचे वडील रियाज सय्यद, भाऊ इम्रान सय्यद आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00586 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..