मोटारीची काच फोडून शिरूरमध्ये एक लाख लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटारीची काच फोडून 
शिरूरमध्ये एक लाख लंपास
मोटारीची काच फोडून शिरूरमध्ये एक लाख लंपास

मोटारीची काच फोडून शिरूरमध्ये एक लाख लंपास

sakal_logo
By

शिरूर, ता. १६ ः भरदिवसा मोटारीची काच फोडून एक लाख रुपये लंपास केल्याची घटना आज दुपारी शिरूर पोलिस ठाण्यापासून अगदी जवळच घडली.

स्वप्नील सुभाष थोरात (रा. रामलिंग रस्ता, शिरूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर, शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यालगत असलेल्या वेदांता हॉस्पिटलसमोर थोरात हे त्यांची मोटार लावून कामानिमित्त जवळच्याच दुकानात गेले होते. परत आल्यावर मोटारीच्या डाव्या बाजूची काच फोडल्याचे व मोटारीतील एक लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले.

दरम्यान, काल रात्री शहरातील मुंबई बाजार परिसरातील एक मोबाईल शॉपीचे दुकाने फोडून चोरट्यांनी तेथून किमती मोबाईल चोरले, तर काल रात्री कवठे येमाई (ता. शिरूर) येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. आसपासचे ग्रामस्थ जागे झाल्याने चोरटे पसार झाले. चोरट्यांची संख्या मोठी असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून निष्पन्न झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00609 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..