शिरूरमध्ये महिलेचा दोघांकडून विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरमध्ये महिलेचा 
दोघांकडून विनयभंग
शिरूरमध्ये महिलेचा दोघांकडून विनयभंग

शिरूरमध्ये महिलेचा दोघांकडून विनयभंग

sakal_logo
By

शिरूर, ता. १९ : शिरूर शहरातील महिलेच्या घरी जाऊन तीला अश्लील भाषेत बोलून अंगाशी झटून विनयभंग केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अभिषेक गंगावणे व रूपेश गंगावणे (दोघे रा. मुंबई बाजार, शिरूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी (ता. १५) रात्री हा प्रकार घडला. याबाबत ३२ वर्षीय महिलेने शिरूर पोलिसांकडे फिर्याद दिली. फिर्यादी महिला आई व मुलासह राहण्यास असून, ती खासगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास या महिलेच्या मोबाईलवर ९७६६७९२८३३ या क्रमांकावरून फोन आला. पलीकडील व्यक्तीने अश्लील भाषा वापरली असता फिर्यादी महिलेने ‘कोण बोलतय?’ असे विचारले असता, ‘मी अभिषेक गंगावणे बोलतोय, तुझ्या घरी येतोय,’ असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला. दरम्यान, नऊच्या सुमारास अभिषेक गंगावणे व रूपेश गंगावणे हे फिर्यादी महिलेच्या घरी आले. घराच्या बाहेरच उभ्या असलेल्या महिलेचा हात धरून दोघांनी विनयभंग केला. महिलेच्या आरडाओरड्यामुळे तिची आई बाहेर आली असता दोघे पळून गेले. त्यांच्याविरुद्ध शिरूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00616 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..