चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून

sakal_logo
By

शिरूर, ता. २३ : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी महादेव सुरेश काळे (मूळ रा. सोगाव पश्चिम, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. खून करून काळे फरार झाला.

पतीने केलेल्या कुऱ्हाडीच्या हल्ल्यात ललिता महादेव काळे (वय ३२) हिचा मृत्यू झाला असून, तिच्या खूनप्रकरणी तिची बहिण चांदणी पवार हिने शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास, महादेव व ललिता या पती-पत्नींत भांडण झाले. त्यावेळीही त्याने पत्नीला चारित्र्यावरून शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, शुक्रवारी पहाटे महादेव काळे याच्या मोटारसायकलचा आवाज झाल्याने त्याची मेहुणी चांदणी पवार हिला जाग आली. तिने घराबाहेर येऊन पाहिले असता, तो मोटारसायकलवर दीड वर्षांच्या छोट्या मुलीला घेऊन घाईघाईने निघून गेल्याने तिला संशय आला. ती आईला उठवून बहिणीच्या घराकडे गेली असता, घरात ललिता काळे ही रक्ताच्या थारोळ्यात, छिन्नविछिन्न अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी टाकळी हाजी आउटपोस्टमधील पोलिसांकडे धाव घेऊन त्यांना याबाबत कळविले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ललिता हिला सरकारी रुग्णालयात हलविले. मात्र, तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला होता. चारित्र्याच्या संशयावरून महादेव काळे यानेच हा खून केल्याचा आरोप चांदणी पवार व तिच्या आईने केल्याने शिरूर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या घटनेनंतर शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, उपनिरीक्षक सुनील उगले यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्लेखोर महादेव काळे याच्या मागावर पोलिस पथके रवाना केल्याचे पोलिस निरीक्षक राऊत यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Sur22b00634 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..