‘शिरूर सेंट्रल’ कॉम्प्लेक्समध्ये गाळेबुकींगसाठी विशेष ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिरूर सेंट्रल’ कॉम्प्लेक्समध्ये 
गाळेबुकींगसाठी विशेष ऑफर
‘शिरूर सेंट्रल’ कॉम्प्लेक्समध्ये गाळेबुकींगसाठी विशेष ऑफर

‘शिरूर सेंट्रल’ कॉम्प्लेक्समध्ये गाळेबुकींगसाठी विशेष ऑफर

sakal_logo
By

शिरूर, ता. ४ : शिरूर बसस्थानकावर सर्व सोयीसुविधांसह उभ्या राहिलेल्या भव्य ‘शिरूर सेंट्रल’ या अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गाळेबुकींगसाठी दसरा ते दिवाळी या कालावधीत विशेष ऑफर जाहीर केली आहे.
‘एस. एस. कन्स्ट्रक्शन’मार्फत शिरूर शहराच्या मध्यवर्ती भागात शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यालगत ‘बीओटी’अंतर्गत उभारलेल्या या संकुलाच्या माध्यमातून शहर व पंचक्रोशीसह शिरूर, पारनेर व श्रीगोंदा या तीन तालुक्यातील व्यापारउदीमाला चालना मिळणार असून, दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधून अनेक व्यावसायिक बुकींगबाबत चौकशी करीत आहेत. ‘एस. एस. कन्स्ट्रक्शन’ने राज्याच्या विविध भागात ४५ प्रकल्प उभारले आहेत.
‘शिरूर सेंट्रल’अंतर्गत विविध आकाराचे तब्बल दोनशेहून अधिक शॉप विक्रीसाठी उपलब्ध असून, अग्निशामक, सीसीटीव्ही, टॉयलेट, सिक्युरिटी, प्रशस्त पार्किंग, गार्डन व कॅंटीन आदी सोयीसुविधांनीयुक्त अशा या संकुलातील गाळेखरेदीसाठी बॅंक कर्जसुविधा उपलब्ध आहे. ‘सकाळ महोत्सव’अंतर्गत सहभागी असलेल्या ‘शिरूर सेंट्रल’च्या ग्राहकांसाठी विशेष बक्षिस योजना असून, दसरा-दिवाळीच्या पावन पर्वात शॉप बुक करणाऱ्या ग्राहकांस चारचाकी, दुचाकीसह कोट्यवधीची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. वेगाने विकसित होत असलेल्या शिरूर शहराच्या वैभवात आणि व्यापारी परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या या संकुलातील शॉपच्या माध्यमातून अनेक मोठ्या ब्रॅण्डचे उद्योग व्यवसाय शिरूरमध्ये येण्यास उत्सुक असून, त्यातून येथील व्यापाराला चालना मिळणार आहे.