कान्हूर येथील मेसाईच्या मंदिरात फुलांची सजावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कान्हूर येथील मेसाईच्या
मंदिरात फुलांची सजावट
कान्हूर येथील मेसाईच्या मंदिरात फुलांची सजावट

कान्हूर येथील मेसाईच्या मंदिरात फुलांची सजावट

sakal_logo
By

शिरूर, ता. ४ : सुवर्णमहोत्सवी नवरात्रोत्सवामुळे श्री क्षेत्र कान्हूर (ता. शिरूर) येथील मेसाई मातेचे मंदिर रोषणाईने उजळून निघाले असून, मंदिर परिसरात सर्वत्र केलेल्या रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीमुळे वातावरण प्रसन्न झाले आहे. काकडा भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण व देवीच्या जागरामुळे कान्हूर परिसर भक्तिमय झाला आहे.
कान्हूर येथे मेसाई देवीचे पुरातन मंदिर आहे. नवरात्राचे औचित्य साधून मेसाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा १९७२ला सुरू झाली. या परंपरेच्या यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत भरगच्च विधी व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात एकनाथ महाराज सदगीर, संदीपान महाराज शिंदे हसेगावकर, माऊली महाराज कदम यांनी किर्तनसेवा बजावली असल्याची माहिती मेसाई देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आनंदराव तळोले यांनी दिली. दररोज सर्वांसाठी महाप्रसाद असतो. आज होमहवनाचा महत्त्वाचा विधी पार पडला. मेसाई देवी दक्षिणाभिमुखी आहे. मंदिरापुढील बाजूला ग्रामस्थांनी प्रवेशद्वार, सभामंडप उभारले असल्याची माहिती सरपंच चंद्रभागा खर्डे यांनी दिली. देवीच्या दर्शनासाठी पुणे, मुंबई, नाशिक येथून भाविक येतात. चैत्र पौर्णिमेला या देवीची यात्रा भरते.