शिरूरमध्ये बाजारपेठेतील इमारतीतील घरातून चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरमध्ये बाजारपेठेतील
इमारतीतील घरातून चोरी
शिरूरमध्ये बाजारपेठेतील इमारतीतील घरातून चोरी

शिरूरमध्ये बाजारपेठेतील इमारतीतील घरातून चोरी

sakal_logo
By

शिरूर, ता. ८ : शिरूर शहरातील भरबाजारपेठेतील पाच कंदील चौकातील इमारतीच्या गॅलरीतून घरात घुसलेल्या चोरट्याने रोख रक्कम व सोन्याच्या दागिण्यांसह दोन लाखाचा ऐवज चोरून नेला. तसेच, जाताना इमारतीखाली लावलेली दुचाकीही पळवून नेली.
याबाबत श्रीहरी विठ्ठल मेंदरकर (रा. कापड बाजार, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूरच्या कापड बाजारातील पाच कंदील चौकातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मेंदरकर राहात असून, इमारतीनजीकच्या बोळात छोटी गॅलरी आहे. त्यातून चोरट्यांनी दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला. मेंदरकर हे आई, पत्नीसह घरात झोपले होते. मात्र, त्यांना चोरट्याची चाहुल लागली नाही. सकाळी सहाच्या सुमारास जागे झाल्यावर दरवाजा उघडलेला व कपाटातील सामानाची उचकापाचक झाल्याचे दिसल्यावर त्यांनी चीजवस्तू शोधण्याचा प्रयत्न केला असता गंठण, मोहनमाळ, कर्णफुले हे सोन्याचे दागिणे, तीन मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. इमारतीखाली लावलेली दुचाकीही चोरट्यांनी पळविली.