सोनेसांगवी सहकारी सोसायटीतर्फे १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनेसांगवी सहकारी सोसायटीतर्फे १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय
सोनेसांगवी सहकारी सोसायटीतर्फे १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय

सोनेसांगवी सहकारी सोसायटीतर्फे १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय

sakal_logo
By

शिरूर, ता. ११ : सोनेसांगवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, सभासदांना १२ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय घेण्यात आला. ऐन दिवाळीच्या तोंडावर लाभांश मिळणार असल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
सोसायटीचे अध्यक्ष हिरामण फक्कड काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस सोसायटीचे संचालक असलेले सोनेसांगवीचे सरपंच दत्तात्रेय कदम, सोसायटीचे उपाध्यक्ष बबन डांगे तसेच रमेश बोऱ्हाडे, अशोक डांगे, आनंदा टाकळकर, भाऊसाहेब शेवाळे, परशुराम डांगे, हरिभाऊ दाते, बजरंग सोनवणे, संदीप डांगे, गंगुबाई शेळके, आशाबाई काळे, रावसाहेब पाचंगे व शहाजी दाते हे संचालक उपस्थित होते.
संस्थेचे ८६१ सभासद असून, संस्थेचे भागभांडवल २८ लाख ४८ हजार १२२ रुपये आहे. मार्च २०२२ अखेर संस्थेला २५ लाख १२ हजार ५४६ रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे सचिव राजू झंजाड यांनी प्रास्तविकात दिली. संस्थेची बॅंक पातळीवरील कर्जवसुली शंभर टक्के तर सभासद कर्ज वसुली ९४ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. वेळेत कर्जभरणा करणाऱ्या सभासदांचा यावेळी शिरूर खरेदी - विक्री संघाचे संचालक दत्तात्रेय त्रिंबक कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभासदांना १२ टक्के लाभांश वाटपाचा एकमुखी ठराव यावेळी करण्यात आला. माजी उपसरपंच शंकर शेळके यांनी आभार मानले.