बस उलटल्याने १४ प्रवासी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस उलटल्याने १४ प्रवासी जखमी
बस उलटल्याने १४ प्रवासी जखमी

बस उलटल्याने १४ प्रवासी जखमी

sakal_logo
By

शिरूर, ता. २२ : पुणे-नगर रस्त्यावर, रांजणगाव एमआयडीसीतील व्हर्लपूल कंपनीसमोर शुक्रवारी (ता.२१) पहाटे भरधाव वेगातील बस उलटल्याने बसमधील १४ प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहेत. तर इतरांवर शिरूर, रांजणगाव गणपती व शिक्रापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार चालू आहेत. अपघातानंतर बसचालक पळून गेला. अपघातातील जखमी प्रवासी डॉ. मंगलसिंग जसवंतसिंग ताजू (रा. कदमवाडी, कलिना, मुंबई, मूळ रा. देवना लाईन रोड, औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी, भरधाव वेगात, निष्काळजीपणे बस चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल केला. हमसफर कंपनीची खासगी प्रवासी बस ही मुंबईतून चाळीस प्रवासी घेऊन औरंगाबाद येथे जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली आणि महामार्गावरच आडवी झाली. रस्त्यातच आडव्या झालेल्या बसमुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभर विस्कळित झाली. या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस पथक, स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविले व जेसीबीच्या साहाय्याने बस बाजूला घेतली.