जांबुतमध्ये बिबट्या जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांबुतमध्ये बिबट्या जेरबंद
जांबुतमध्ये बिबट्या जेरबंद

जांबुतमध्ये बिबट्या जेरबंद

sakal_logo
By

शिरूर, ता. ६ : जांबूत (ता. शिरूर) येथे महाविद्यालयीन युवतीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात आज (ता.५) पहाटे पूर्ण वाढ झालेला बिबट्या जेरबंद झाला. पूजा नरवडे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हल्ला करून तिला ठार केलेल्या घटनास्थळापासून आत्तापर्यंत दोन बिबटे पकडले आहेत.
गेल्या दोन महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात जांबूत परिसरात पूजा भगवान नरवडे व सचिन बाळू जोरी यांना जीव गमवावा लागला. गतवर्षी जांबूत गावच्याच जोरी लवण परिसरात समृद्धी जोरी या अडीच वर्षीय बालिकेलाही बिबट्याने ठार मारले होते. पूजाच्या मृत्यूनंतर वनविभागाने जांबूत, जोरी वस्ती, जोरी लवण, जोरी मळा आदींसह पिंपरखेड, कान्हूर मेसाई या परिसरात तब्बल १८ पिंजरे लावले आहेत. जोरी मळ्यातील पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्या आढळून आला. पिंजऱ्यात अडकलेला हा या परिसरातील दुसरा बिबट्या आहे. हा नर जातीचा सात वर्षे वयाचा बिबट्या असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले. पकडलेल्या या बिबट्याची माणिकडोह बिबट निवारा केंद्रात रवानगी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या तोच
पूजा नरवडेवरील हल्ल्यानंतर २२ ऑक्टोबरला घटनास्थळाजवळील पिंजऱ्यात मादी बिबट अडकल्यानंतरही या परिसरात बिबट्याच्या वावराच्या तक्रारी येत होत्या. पूजावर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या परिसरातील सीसीटीव्ही मध्ये नर बिबट्याचा दोन वेळा वावर दिसून आला होता. आज पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या तोच असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
-------------------------------------------
01351