शिक्षिकेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षिकेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली
शिक्षिकेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली

शिक्षिकेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली

sakal_logo
By

शिरूर, ता. ४ : येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने, शाळेतून घरी जाणाऱ्या शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. दुचाकीवरील चोरट्यांकडून सोनसाखळी चोरीचा हा गेल्या महिनाभरातील दूसरा प्रकार आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सीमा अमर ओहोळ (वय ३५, रा. गुजर मळा, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांना आज अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ओहोळ या विद्याधाम प्राथमिक शाळेत शिक्षिका असून, दुपारच्या सुटीत जेवणासाठी म्हणून त्या घरी गुजर मळा येथे जात असताना, माऊली हॉस्पिटलच्या बाजूने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्याजवळ दुचाकीचा वेग कमी केला व त्यांच्यावर झडप घालून क्षणात त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तोडून नेली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करीत आहेत.