महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

sakal_logo
By

शिरूर, ता. ११ : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील महागणपतीच्या दर्शनासाठी दिवसभर सन २०२२ या सालातील शेवटची संकष्टी चतुर्थी आणि त्यातच रविवारची सुटी यामुळे भाविकांची गर्दी उसळली होती. ''गणपती बाप्पा मोरया'', ''महागणपती मोरया'' च्या गजराने मंदिर परिसर दणाणून गेला होता.


संकष्टी चतुर्थीनिमित्त पहाटे पाच वाजता अभिषेक झाल्यानंतर महागणपतीला शाही गादीवर स्थानापन्न करून सुवर्ण कोयऱ्याजडीत गुलाबी वस्त्र नेसविण्यात आले. शमी, दूर्वा आणि मोगऱ्याच्या फुलांचा हार घातल्यावर आधीच मंगलमय असलेले महागणपतीचे रूप आणखी गोजिरे - साजिरे दिसू लागले. नैमित्तिक पूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. महागणपतीच्या गाभाऱ्यात प्रगतिशिल शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महागपणतीच्या गाभाऱ्यात व मंदिरात गुलाब, जरबेरा, ऑथोरियम, ब्लू डीजी, कामिनी या फुलांची सजावट करण्यात आली होती. महागणपतीच्या दर्शनाबरोबरच ही सजावट पाहण्यासाठी भाविकांची पावले गाभाऱ्यात थबकत होती.
दुपारी बारा वाजता देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापूजा करून महानैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबनीस संतोष रणपिसे, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
दरम्यान, रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

अभिनेते श्रेयस तळपदे यांनी घेतले दर्शन
पूर्वाम्नाय गोवर्धन पूरी पिठाधीश्वर जगदगुरू शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देव तीर्थजी महाराज यांनी महागणपतीचे दर्शन घेतले. देवस्थान च्या वतीने प्रा. नारायण पाचुंदकर यांनी त्यांचा सन्मान केला. अभिनेते श्रेयस तळपदे यांनीही महागणपतीचे दर्शन घेतले. त्यांचा गोऱ्हे यांनी सन्मान केला.

01491