कवठे येमाईत बिबट्याचा गाईच्या वासरावर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवठे येमाईत बिबट्याचा
गाईच्या वासरावर हल्ला
कवठे येमाईत बिबट्याचा गाईच्या वासरावर हल्ला

कवठे येमाईत बिबट्याचा गाईच्या वासरावर हल्ला

sakal_logo
By

शिरूर, ता. १० : तालुक्याच्या बेट भागात बिबट्यांची दहशत कायम असताना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कवठे येमाई येथील म्हातोबा नगर परिसरात बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केला. परंतु, इतर गाईंच्या ओरडण्याने आसपासचे लोक जागे झाल्याने बिबट्या पळून गेला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षे वयाचे गाईचे वासरू गंभीर जखमी झाले.
म्हातोबा नगर परिसरात बबनराव इचके वास्तव्यास असून, घराजवळच त्यांचा गाईंचा गोठा आहे. गोठ्यात व परिसरात त्यांनी गाई बांधल्या होत्या. वासरू बाहेरच्या बाजूला बांधलेले होते. पहाटेच्या सुमारास बिबट्याने वासरावर झडप घालून त्याचे नरडे पकडले. वासरानेही प्रतिकार केला, मात्र त्याची बिबट्याच्या तावडीतून सुटका होऊ न शकल्याने ते ओरडू लागले. त्या आवाजाने इतर गाईदेखील जोरजोराने ओरडू लागल्याने इचके कुटुंबीय व आसपासचे लोक जागे झाले. इचके यांनी गोठ्याकडे धाव घेताच वासराला सोडून देऊन बिबट्याने धूम ठोकली.
बिबट्याच्या वासरावरील हल्ल्याचा थरार इचके यांच्या घराच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.