रांजणगाव चौकात 
कामगाराचा मृत्यू

रांजणगाव चौकात कामगाराचा मृत्यू

शिरूर, ता. २१ : पुणे-नगर रस्त्यावर रांजणगाव (ता. शिरूर) ‘एमआयडीसी’जवळील राजमुद्रा चौकात खासगी बसच्या धडकेत दुचाकीवरील कामगाराचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. राजेंद्र सुरेश पाटील (वय ३२, रा. रांजणगाव एमआयडीसी, मूळ रा. नवगाव, ता. अमळनेर, जि. जळगाव) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. खासगी कंपनीत कामाला असलेले पाटील कामावरून सुटी झाल्याने आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना राजमुद्रा चौकात त्यांना खासगी बसने ठोकरले. बसचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत अपघाताला कारणीभूत असलेली बस ताब्यात घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com